Santosh Deshmukh Case : बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?

Santosh Deshmukh Case : बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?

| Updated on: Dec 20, 2024 | 11:07 AM

बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर केवळ विरोधकच नाही तर बीड जिल्ह्यातील काही आमदार सुद्धा चिंता वर्तवू लागले आहेत. त्यामुळे बीडचा बिहार होतोय की बीडमध्ये गँग्स ऑफ वासेपूर सारख्या टोळ्या तयार होतायंत?

बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर केवळ विरोधकच नाही तर बीड जिल्ह्यातील काही आमदार सुद्धा चिंता वर्तवू लागले आहेत. त्यामुळे बीडचा बिहार होतोय की बीडमध्ये गँग्स ऑफ वासेपूर सारख्या टोळ्या तयार होतायंत? अशी चिंता आता बीड जिल्ह्याला सतावतेय. तर हा सवाल जनता नाहीतर जनतेचे निवडून दिलेले नेत्यांना पडलाय. याचं कारण म्हणजे बीडच्या सरपंचाची क्रूर हत्या… आणि गेल्या काही दिवसांचा घटना. संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रामुख्याने नाव घेतलं जातंय ते वाल्मिक कराडचं… वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहे. लोक वाल्मिक कराडला प्रति धनंजय मुंडे तर काही लोकं धनंजय मुंडे हूनही त्याला मोठं मानतात. समारंभ असो सेलिब्रेशन, मेळावा असो किंवा राडा मंत्री धनंजय मुंडेंसोबत सावली प्रमाणे वावरणाऱ्या या माणसाकडे विरोधकच नाहीतर सत्ताधारी आमदार देखील बोट दाखवताय. मात्र वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल असूनही एक-दोन अपवाद सोडून अनेक नेते त्याचं नाव घ्यायला का कचरले हा सवाल देखील सभागृहात उपस्थित झालाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 20, 2024 11:07 AM