Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karad Audio Clip Viral : आकामुळे धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत येणार? 'कराड फोनवर सांगतोय, आपणच इथले बाप...'

Karad Audio Clip Viral : आकामुळे धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत येणार? ‘कराड फोनवर सांगतोय, आपणच इथले बाप…’

| Updated on: Jan 29, 2025 | 11:45 AM

आका अर्थात वाल्मिक कराडवरून मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. कारण फोनवरून ज्या प्रकरणाला वाल्मिक कराड किरकोळ म्हणतोय ते प्रकरण भयानक असल्याचे आमदार सुरेश धस म्हणताय. काय आहे ती क्लिप?

आका हा शब्द वाल्मिक कराडसाठी किती बिनचूक आहे. हे सिद्ध करणाऱ्या वाल्मिक कराडच्या अनेक ऑडिओ क्लिप समोर येऊ लागल्यात. इथे आपण बाप बसलोय. कशाला घाबरताय? असं म्हणत गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला कराड पाठबळ देतोय. बीडचे पोलीस अधिकारी देखील एखाद्या कलेक्टरचा फोन आल्याप्रमाणे कराडशी आदबीने बोलताय. लोकसभेदरम्यान, सोशल मीडियावर काही समाज कंटकांकडून जातीय तेढ निर्माण कऱणाऱ्या पोस्ट सुरू होत्या. त्यासंदर्भात बीड पोलिसांनी काही तरूणांवर गुन्हे दाखल केलेत. तर हाच दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी एक व्यक्ती कराडला फोन करतो. यानंतर या व्यक्तीत आणि वाल्मिकमध्ये नेमकं काय संभाषण झालं? यांच्यात बोलणं झाल्यानंतर वाल्मिक कराड कोणाशी संपर्क साधतो? त्यांच्यात काय बोलणं होतं?  ती क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ‘किरकोळ गुन्हा आहे. आपला पोरगा आहे. जाऊद्या द्या सोडून’, असं ऐकायला मिळत आहे. तर मी बीड जिल्ह्याचा बाप आहे. मी असल्यावर चिंता काय असाही संवाद या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. दरम्यान टीव्ही ९ मराठी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 29, 2025 11:45 AM