Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
Santosh Deshmukh Case Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याबद्दल मोठे खुलासे झालेले आहेत. डीवायएसपी विश्वंभर गोल्डे यांचा या प्रकरणातील जबाब आता समोर आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा या प्रकरणातला जबाब आता समोर आला आहे. आरोपी वाल्मिक कराड हा तुरुंगात असला तरी त्याच्या समर्थकांची दहशत अजूनही कायम असल्याचं गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हंटलं आहे. कराडच्या समर्थकांनी कोर्ट परिसरातसुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता असा उल्लेख त्यांनी या जबाबात केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत महत्वाचा जबाब बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी दिला आहे. हा जबाब टीव्ही 9च्या हाती आला आहे. वाल्मिक कराड जेलमध्ये असताना देखील त्याच्या समर्थकांची दहशत कायम असल्याच गोल्डे यांनी यात म्हंटलं आहे. तसंच 2014 पासून या परिसरात वाल्मिक कराडची दहशत होती. त्याचबरोबर कराड हा गुन्हेगार असताना देखील् स्वत:सोबत पोलीस ठेवायचा. त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलेलं होतं, याचा सुद्धा उल्लेख त्यांनी या जबाबात केला आहे. वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर जेव्हा त्याला सिटी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं तेव्हा त्या पोलीस ठाण्याच्या बाहेर सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांनी दहशत पसरवली होती, दगडफेक करून गोंधळ घातला होता. आत्ता देखील कराड तुरुंगात असतानाही बीडच्या उपविभागात त्याच्या समर्थकांची आणि त्याची दहशत कायम असल्याचा सुद्धा उल्लेख या जबाबात करण्यात आलेला आहे.