Walmik Karad Video : वाल्मिक कराडवर मकोका अन् कराड समर्थक आक्रमक, 10 मिनिटांत परळी बंदची हाक

Walmik Karad Video : वाल्मिक कराडवर मकोका अन् कराड समर्थक आक्रमक, 10 मिनिटांत परळी बंदची हाक

| Updated on: Jan 15, 2025 | 11:38 AM

वाल्मिक कराडवर मकोका लागताच कराड समर्थक चांगलेच आक्रमक बनलेत. समर्थक आक्रमक होत ते रस्त्यावर उतरले इतकंच नाहीतर दुकानं बंद करत त्यांनी परळी बंदची हाक दिली.

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लागताच कराड समर्थक चांगलेच आक्रमक बनलेत. समर्थक आक्रमक होत ते रस्त्यावर उतरले इतकंच नाहीतर दुकानं बंद करत त्यांनी परळी बंदची हाक दिली. तर कुठे जाळपोळ तर कुठे टॉवर चढत आंदोलनही करण्यात आलीत. सर्वात आधी राग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरलेल्या सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बंजरंग सोनावणे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर उमटला. समर्थकांनी या नेत्यांच्या पोस्टरवर राग काढला आणि जोडे मारो आंदोलन केलं. मस्साजोगमध्ये एक दिवस आधीच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. त्यानंतर वाल्मिक कराड समर्थकांनी देखील परळीत राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून आंदोलन केलं होतं. तर दुपारी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्याची बातमी समोर येताच कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आणि सर्व बाजारपेठ बंद केली. ऐन संक्रांतीत भर दुपारी परळी बाजारपेठमध्ये शुकशुकाट पसरला. तर सकाळी परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईनं ठिय्या आंदोलन केलं. माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे म्हणत वाल्मिक कराडला अडकवलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 15, 2025 11:38 AM