वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे, त्यांनी आम्हाला..,’ काय म्हणाले धनंजय देशमुख
संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने पूर्ण झालेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड सह सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे. या प्रकरणाती एक महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.आता या प्रकरणात हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू यांनी आरोप केला आहे.
मस्साजोगचे सरपंत संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना न्यायालयात आणले जाते. तेव्हा त्यांची बी टीम त्यांच्या कायम सोबत असते यांच्याकडून आमच्या दडपण आणि दहशत दाखविली जात असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपीला सोडायला गेलेले, भावाच्या पाठी जी गाडी होती तिला घरी पोहचवणारे बालाजी तांदळे, वर्षा गावचे सरपंच संजय केदार, फोन पे पैसे झालेले डॉ सुभाष वायबसे,मोराळे या चौघांचा समावेश या बी टीममध्ये आहे. यांच्याकडून आम्हाला मोठा धोका आहे. संजय केदारे आणि इतर सर्व जण घटना घडल्यानंतर दहा दिवस गायब होते. आम्हाला वेळोवेळी धमक्या येत आहेत असाही आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की कोणालाही सोडले जाणार नाही. जर देशमुख यांना धमक्या येत आहेत तर त्यांनी रितसर तक्रार करावी अशी मागणी भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
