मुलांचं शिक्षण अन् घरखर्च भागवायचा कसा? शेतकरी हतबल, कुणी केली फसवणूक

मुलांचं शिक्षण अन् घरखर्च भागवायचा कसा? शेतकरी हतबल, कुणी केली फसवणूक

| Updated on: Apr 17, 2023 | 12:17 PM

VIDEO | शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर, पैसा बुडवला आता मुलांचं शिक्षण अन् घरखर्च भागवायचा कसा? कुठं झाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक?

बुलढाणा : चिखली येथील व्यापारी संतोष गळे, अंकुश गाडे आणि त्यांचा साथीदार या तिघांनी मिळून जिल्ह्यातील जवळपास 300 शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आणि त्यांनी गावातून पोबारा केलाय. त्यामुळे आता पुढील घर खर्च, दवाखाना, मुलांचे शिक्षण कसे करायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे, त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना प्रशासनाने तत्काळ अटक करून आमचे पैसे आम्हाला द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथील गजानन ठेंग हे शेतकरी असून मोलमजुरी करतात तर काही प्रमाणात थोक्याची शेती सुद्धा करतात. शेतकरी गजानन थेंग यांनी सुद्धा आपली सोयाबीन गाडे बंधूंना विकली होती. त्यांच्याकडे पावणे दोन लाख रुपये असून, वारंवार चकरा मारल्या, मात्र सहा महिने उलटले तरीही पैसे मिळाले नाही आणि आता गाडे बंधुसह त्यांचा साथीदार पैसे घेऊन फरार झाले. घरात दोन मुले, त्यांचे शिक्षण, घरात अठरा विश्व दारिद्रय, घराचा खर्च, दवाखाना कसा करायचा, याच चिंतेत गजानन ठेंग आणि त्यांचे कुटुंब जगत आहे.