संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं; काय आहे प्रकरण?
VIDEO | माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आलं आणि...
नाशिक : माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐतिहासिक काळाराम मंदिरातच हा प्रकार घडला आहे. स्वत: संयोगिताराजे यांनीच हा प्रकार आपल्या सोशल मीडियावर एक पोस्टवरून सांगितला आहे. शंभर वर्षापूर्वी जे शाहू महाराजांबाबत घडलं तेच संयोगिताराजेंबाबत घडल्याने संताप व्यक्त होत आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांचा मागच्या महिन्यात वाढदिवस झाला. पहिल्यांदाच संभाजी छत्रपती यांचा वाढदिवस नाशिकमध्ये साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या गराड्यात हा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. संयोगिताराजे छत्रपती या सुद्धा नाशिकमध्येच होत्या. त्यामुळे संयोगिताराजे या संभाजी छत्रपती यांच्यासोबत काळाराम मंदिरात गेले होते. मंदिरात दर्शन घेत असताना त्यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंताने मज्जाव केला. त्यामुळे त्या संतापल्या. त्यांनी या महंताला सुनावले. झाला प्रकार त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे.