‘मी चोराकडेच न्याय मागत होती, पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही’, मामीकडूनच मुंडे बंधू-भगिनीवर गंभीर आरोप
सारंगी महाजन यांच्या आरोपानुसार, त्यांच्या पतीच्या नावे असलेली जमीन परळीमध्ये बळकवली गेली. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी दमदाटी करून हा सगळा प्रकार केला असे आरोप सारंगी महाजन यांनी केला.
काही सत्ताधारी आणि विरोधकांनंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांचे नातलग नात्यानं मामी लागणाऱ्या सारंगी महाजन यांनी जमिन हडपली असल्याचे गंभीर आरोप मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेत. सारंगी महाजन या प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. परळीमध्ये अवैध्य धंदे आणि बंदुकशाहीनंतर आता जमिनीच्या व्यवहारावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. हे आरोप नात्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी असणाऱ्या सारंगी महाजन यांनीच केल्याचे पाहायला मिळत आहेत. सारंगी महाजन यांच्या आरोपानुसार, त्यांच्या पतीच्या नावे असलेली जमीन परळीमध्ये बळकवली गेली. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी दमदाटी करून हा सगळा प्रकार केला. असे आरोप सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापूर्वीही केले होते. दरम्यान, बीड प्रकरण तापलेलं असताना सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पुन्हा एकदा कारवाईची मागणी केली आहे. बघा काय म्हणाल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन?