Walmik Karad BIG Breaking : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, वाल्मिक कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज आरोपी वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज आणखी एक बातमी समोर येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज आरोपी वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केज कोर्टाकडून वाल्मिक कराडला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे २२ तारखेपर्यंत वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत असणार आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या चौकशीसाठी एसआयटीकडून १० दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र केज कोर्टाकडून वाल्मिक कराडला अखेर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीडच्या मकोका कोर्टात या संदर्भात आज सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले आणि कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाकडून हा निकाल जाहीर कऱण्यात आला.