बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी; आव्हाडांच्या आक्षेपानंतर थेट उचलबांगडी
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या तीन अधिकाऱ्यांमध्ये एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं […]
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या तीन अधिकाऱ्यांमध्ये एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं आहे. राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथक म्हणजे SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. यासह वाल्मिक कराड सोबत फोटो त्यांनी फोटे शेअर करणं हे त्यांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होतोय. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.