संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी अन् ते अस्वस्थ… पत्नीच्या जबाबानंतर एकच खळबळ
आज बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला महिना उलटून गेला. या प्रकरणाच्या चौकशीला सध्या वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधीच त्यांना धमकी आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी मिळाल्यानंतर ते अस्वस्थ झालेले होते, असा जबाब संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीकडे नोंदवला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.