साताऱ्यात खळबळ… एकाच वर्गात जुळलं प्रेम, संशयाने केला घात.. त्यानं तिला घरी बोलवलं अन्…
satara crime news in marathi : प्रियकर आणि प्रियसी कराड येथील मेडीकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. एकमेकांच्या प्रेमात पडले. पण संशयाने घात केला... प्रियकराने प्रियसीला घरी बोलावले नंतर त्याचं इमारतीवरुन ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.
साताऱ्यातील कराडमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रियसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. आरुषी मिश्रा असे त्या प्रियसीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे. हे प्रियकर आणि प्रियसी कराड येथील मेडीकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. आरुषी आणि ध्रृव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हापासून या दोघांचे प्रेम होते. त्यानंतर त्यांनी एकत्रच कराडातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ध्रृव हा मेडीकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डींगमध्ये राहत होता. ध्रृवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबध आहेत असे म्हणत ध्रृव आणि आरुषीची यांच्या वादावादी झाली. त्यानंतर ध्रृवने आरुषीला दुसऱ्यामजल्यावरुन ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ध्रृवही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री उशीरा या आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री ध्रृववर गुन्हा दाखल करण्यात आलाय.