इन्स्टाग्रामवरील मस्करीची झाली कुस्करी; खोडसाळपणामुळे मैत्रिणीचा जीव गेला? नेमकं झालं काय?
इन्स्टाग्रामवर मुलाच्या नावे बनावट अकाऊंट तयार करून मैत्रिणीची फसवणूक केली आहे. हा सगळा प्रकार साताऱ्यात घडला आहे. फेक अकाऊंट असणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तुम्ही सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक करत असाल तर ही बातमी वाचा… इतकंच नाहीतर सोशल मीडियावरील कोणतंही अॅप्लीकेशन वापरताना जरा जपून वापरा… कारण इन्स्टाग्रामवरील मस्करी मैत्रिणीच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. इन्स्टाग्रामवर मुलाच्या नावे बनावट अकाऊंट तयार करून मैत्रिणीची फसवणूक केली आहे. हा सगळा प्रकार साताऱ्यात घडला आहे. फेक अकाऊंट असणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने मृत्यू झाल्याचे कळवले. मात्र मृत्यूची बातमी कळताच तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळतेय. सायबर पोलिसांच्या तपासात इन्स्टाग्रामवरील झालेल्या चॅटिंगवरून हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. बघा नेमकं काय घडलं?
Published on: Jul 31, 2024 04:36 PM
Latest Videos