सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राडा?

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राडा?

| Updated on: Nov 21, 2021 | 11:56 AM

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा बँकेच्या 11 जागा बिनविरोध झाल्या असून 10 जागांसाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवडणुकीकडं प्रामुख्यानं जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा बँकेच्या 11 जागा बिनविरोध झाल्या असून 10 जागांसाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवडणुकीकडं प्रामुख्यानं जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. शशिकांत शिंदे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचेच ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान निर्माण केलं आहे. पक्षाच्या बड्या नेत्यांनी समजूत काढून देखील रांजणे यांनी माघार घेतलेली नाही. आज मतदानाच्या दिवशी या कारणामुळे जावलीतील मेढा येथे दोन्ही उमेदावारांचे समर्थक आमनेसामने आले. अखेर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

Published on: Nov 21, 2021 11:56 AM