Satara | मद्य पिण्याचा अट्टहास, व्यसनमुक्ती केंद्रावर आलेल्या मद्यपीचा विजेच्या टॉवरवर धिंगाणा
कोयना धरण परिसरातील दास्तान गावात एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एका विजेच्या टॉवरवर मदपी चढला आणि दारु पिण्यासाठी धिंगाणा घालू लागला. 80 फुट उंचावर चाढलेल्या मदपीला वाचवण्यासाठी रात्रभर प्रयत्न सुरु होते. मदपीमुळे मुख्य विद्युत प्रवाह देखील बंद करण्यात आला होता. काल सायंकाळी 6 वाजता चढलेल्या मदपीला पहाटे 5 वाजता उतरवण्यात अखेर प्रशासनाला यश आलं.
कोयना धरण परिसरातील दास्तान गावात एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एका विजेच्या टॉवरवर मदपी चढला आणि दारु पिण्यासाठी धिंगाणा घालू लागला. 80 फुट उंचावर चाढलेल्या मदपीला वाचवण्यासाठी रात्रभर प्रयत्न सुरु होते. मदपीमुळे मुख्य विद्युत प्रवाह देखील बंद करण्यात आला होता. काल सायंकाळी 6 वाजता चढलेल्या मदपीला पहाटे 5 वाजता उतरवण्यात अखेर प्रशासनाला यश आलं. विद्युत प्रवाह खंडित केल्यामुळे विद्युत महामंडळाला एका मिनिटाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने त्याला सुरक्षित खाली उतरवण्यात आलं.
मदपीचे नाव करिअप्पा तुकाराम कंटेकर असे आहे. हा बेळगाव येथील आथणी येथील रहिवासी आहे. कोयनेतील व्यसनमुक्ती केंद्रात याची दारु सोडवण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी त्याला आणले होते. मात्र, दारु प्यायच्या अट्टाहासापायी हा मद्यपी थेट हाय होल्टेज असलेल्या मुख्य टॉवरवर चढला. तेव्हा विद्युत प्रवाह देखील सुरु होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी विद्युत प्रवाह बंद केला.