'कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं ...', शरद पवारांचा उदयनराजेंना खोचक टोला

‘कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं …’, शरद पवारांचा उदयनराजेंना खोचक टोला

| Updated on: Apr 30, 2024 | 1:25 PM

माझ्या कॉलरवर त्यांचं प्रेम आहे. त्यांनी कॉलर उडवून मला आताच निवडून दिलं पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले होते. दरम्यान, उदयन राजे यांना शरद पवारांनी प्रत्युत्तर देत खोचक टोलाही लगावला आहे. 'कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ? हे बघावं लागतं... हे न समजणाऱ्यांवर...', आणखी काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी साताऱ्यातील प्रचारसभेत कॉलर उडवल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी देखील कॉलर उडवली. उदयनराजे यांनी कॉलर उडवल्यानंतर त्यांनी सकाळी उडवली की संध्याकाळी असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या याच टीकेवरून उदयनराजे भोसले यांनी पलटवार केला आहे. यावेळी ते म्हणाले, माझ्या कॉलरवर त्यांचं प्रेम आहे. त्यांनी कॉलर उडवून मला आताच निवडून दिलं पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले होते. दरम्यान, उदयन राजे यांना शरद पवारांनी प्रत्युत्तर देत खोचक टोलाही लगावला आहे. शरद पवार म्हणाले, कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ? हे बघावं लागतं, आणि हे न समजणाऱ्यांवर अधिक बोलण्याची गरज नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो. पण मत देताना गादीला मत देत नाही तर कष्टकऱ्यांच्या प्रतिनिधींचा आपण सन्मान मतांच्या रूपाने करू, असे पवार म्हणाले.

Published on: Apr 30, 2024 01:25 PM