Udayanraje on Mavia | मविआ सरकार पडलेलंच आहे-tv9
तसेच या सरकारकडे आता आमदार नसून ज्याच्याकडे बहुमत आहे तोच सरकार स्थापण करतो. त्यामुळे शिंदेगट सरकार स्थापन करण्यात भूमिका पार पडेल असे संकेत त्यांनी दिले आहेत.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Sarkar) आता उतरती कळा लागली असून शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली आहे. तर तब्बल 40 च्या वर आमदारांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिंदे गटाची स्थापना केली आहे. तर शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असून ज्यात त्यांनी देशातला सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप असल्याचे म्हटलं आहे. यावरून स्पष्ट होतं की आता हे सरकार पडणार असून शिंदे गट हा भाजपला सपोर्ट करणार आणि महाविकास आघाडी सरकार पडणार. यावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ज्यात त्यांनी हे सरकार आता पडणार असल्याचे म्हटलं आहे. तर हे मविआ सरकार पडलेलंच आहे असेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच या सरकारकडे आता आमदार नसून ज्याच्याकडे बहुमत आहे तोच सरकार स्थापण करतो. त्यामुळे शिंदेगट सरकार स्थापन करण्यात भूमिका पार पडेल असे संकेत त्यांनी दिले आहेत.