आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं, मग नांगरायला घ्यायचं; अमोल कोल्हे असं का म्हणाले?
Politics Loksabha Election 2024 : पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...
कराड, सातारा : पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलंय. “निवडणुकीला अजून वेळ आहे. उद्या होणारी निवडणूक लढायची की नाही? हे आता कशाला सांगायचं? आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. साताऱ्यातील कराडमध्ये होणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याची माहिती देण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांना आगामी निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्याच आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं, याचा अर्थ भाजपामधून मला ऑफर आहे असा होतो का? असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
Published on: Apr 15, 2023 08:04 AM