स्वर्गीय देसाई स्मारकावरून साताऱ्यात राजकारण पेटलं; राजघराण्यातच जुंपली, पालकमंत्री देसाई यांच्यावरही निशाणा

स्वर्गीय देसाई स्मारकावरून साताऱ्यात राजकारण पेटलं; राजघराण्यातच जुंपली, पालकमंत्री देसाई यांच्यावरही निशाणा

| Updated on: Jun 20, 2023 | 10:01 AM

सध्या येथे जारदार टोलेबाजी आणि राजकारण होताना दिसत आहे. येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात वार पलटवार होताना दिसत आहे.

सातारा : पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासून काही अंतरावर स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे स्मारक उभारले जात आहे. त्यावरून सध्या येथे जारदार टोलेबाजी आणि राजकारण होताना दिसत आहे. येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात वार पलटवार होताना दिसत आहे. यावरूनच काहींची उंची नाही, बौद्धिक पात्रता नाही, हा वयाचा भाग असू शकतो अथवा अनुभव कमी असू शकतो अशी टीका शिवेंद्रराजे यांच्यावर उदयनराजे यांनी केली. तर माझा काही संबंध नसताना उदयनराजे स्वतःच्या विश्वात असतात असं बोललं गेलं, हो मी लोकांच्या विश्वात असतो असा शिवेंद्रसिंहराजे यांना टोला होता. त्यावरून शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यासह पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावरही निशाणा साधत सल्ले दिला. त्यांनी, खासदार उदयनराजे जर एवढे विद्वान आहेत. तर ते खासदारकीला का पडले. याचे आकलन त्यांनी करावं असा खोचक सल्ला दिला. तर भूमाता दिंडी काढून ते तीन वेळा खासदार झाले. त्याचा काही उपयोग झाला नाही. ही इलेक्शनपूर्ती दिंडी होती.

Published on: Jun 20, 2023 10:01 AM