ऊसाने भरलेला Truck कालव्यात कोसळला, Wai तालुक्यातील Pasarni येथील घटना
हा व्हिडीओ तिथं अपघात पाहत असलेल्या अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. ट्रक पाण्यात कोसळल्यानंतर कालव्यातील पाणी कालव्याच्या बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय.
सातारा – गळीप हंगाम सुरू झाल्यानंतर ट्रक (truck) आणि ट्रॅक्टर जवळून प्रवास करीत असताना किंवा गाड्या चालवत असताना चार हात लांब राहतात. कारण उसाने भरलेल्या ट्रक आणि ट्रॅक्टरचे नकळतपणे अपघात होतात. साताऱ्या (satara) जिल्ह्यातील वाई (wai) तालु्क्यात पसरणीतल्या भैरवनाथ परिसरात उसाने भरलेला ट्रक शुक्रवारी दुपारी कालव्यात कोसळला आहे. ट्रक पाण्यात कोसळणार असल्याची चालकाला जाणीव झाल्याने चालकाने एका बाजूला झुकलेला ट्रक कालव्याच्या शेजारी उभा केला होता. तसेच ट्रकला दोरीच्या साहाय्याने एका बाजूला ओढण्याचा प्रयत्न देखील चालकाने लोकांच्या साहाय्याने केला आहे. लोकांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर सुध्दा ट्रक पाण्यात कोसळत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ तिथं अपघात पाहत असलेल्या अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. ट्रक पाण्यात कोसळल्यानंतर कालव्यातील पाणी कालव्याच्या बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय.