Teju Satish Bhosale : ते मटन रानडुकराचं व्हतं, हरणाला आम्ही बी देव मानतो..; खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
Teju Bhosale On Deer Hunting : माझ्या नवऱ्याला आणि सुरेश धस यांना फसवलं जात असल्याचा दावा खोक्याची बायको तेजु भोसले हीने केला आहे. हरणाचं मांस खाल्याच्या विवादावरून तिने ही प्रतिक्रिया दिली आहे.
हरीण आमचा देव आहे. हरणाच्या मांसाचे आरोप खोटे आहेत, असं खोक्या भोसलेची बायको तेजु भोसलेने म्हंटलं आहे. सुरेश धस यांना फसवलं जात आहे, असंही तेजु भोसलेने म्हंटलं आहे. तसंच घरात सापडलेलं मांस रानडुकराचं होतं, हरणाचं नाही असं तेजु भोसले म्हणाली आहे.
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर पैसे उधळतो, हरणाची शिकार करतो, सोनं उधळतो असा आरोप झाला होता. त्यावर आज तेजु भोसलेने प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे सगळे खोटे आरोप आहेत. हरीण मारणं वगैरे ते करत नाही. हरणं आम्हाला माहीतचं नाही. आम्ही रानडुक्करची शिकार करतो. घरात संपलेलं मांस हे रानडुक्कर आणि देवाला बोकड कापला होता त्याचं होतं. सुरेश धस म्हणतात तसं आम्हाला फसवलं जात आहे. हरणाला आम्ही देव मानतो. पण गावातले लोक माझ्या नवऱ्याला फसवत आहेत, असंही यावेळी तेजु भोसलेने म्हंटलं आहे.

VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू

पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी

छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
