Satish Sawant | साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याचा कौल, ईश्वरचिठ्ठीने सतीश सावंत यांचा पराभव
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विठ्ठल देसाई आणि सतीश सावंत यांना समान मतं मिळाली. त्यामुळे विजयी उमेदवार ठरवणं कठीण होऊन बसल्यामुळे शेवटी चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित करण्याचे ठरले. दोन्ही उमेदवारांचे भविष्य ठरवण्यासाठी देवेश नरेंद्र एडके या साडेतीन वर्षाच्या मुलाची निवड करण्यात आली.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विठ्ठल देसाई आणि सतीश सावंत यांना समान मतं मिळाली. त्यामुळे विजयी उमेदवार ठरवणं कठीण होऊन बसल्यामुळे शेवटी चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित करण्याचे ठरले. दोन्ही उमेदवारांचे भविष्य ठरवण्यासाठी देवेश नरेंद्र एडके या साडेतीन वर्षाच्या मुलाची निवड करण्यात आली. त्यानंतर देवेश याने सतीश सावंत यांच्याविरोधात उभे राहिलेले विठ्ठल देसाई यांचे नाव असलेली चिठ्ठी काढली. या एका चिठ्ठीनंतर सावंत यांचा पराभव झाला तर विठ्ठल देसाई यांच्या गोटात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. एवढी मोठी जबाबदारी पार पाडताना या छोट्या देवेशने न घाबरता चिठ्ठी काढली आहे. तर या कामासाठी देवेशची निवड झाली याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईने दिलीय.
Latest Videos