सत्यजित यांचे वडील सुधीर तांबे मतदानासाठी पोहोचले, भाजपच्या पाठिंब्यावर काय म्हणाले?

| Updated on: Jan 30, 2023 | 9:27 AM

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. पाहा व्हीडिओ...

संगमनेर :  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठीही आज मतदान पार पडत आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळतंय. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे, सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे, वर्षा तांबे यांनीही बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. संगमनेर येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. डॉ.सुधीर तांबे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. मात्र भाजपच्या पाठिंब्याबाबत बोलणं त्यांनी टाळलं.

नाशिक पदवीधर मतदारसंघात पाटील-तांबेंमध्ये लढत, जाणून घ्या दिवसभरातील ताज्या घडामोडी
विजय आपलाच, फक्त औपचारिकता बाकी; शुभांगी पाटील यांचा दावा