Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी, सौरभ त्रिपाठीला लखनऊमधून अटक

| Updated on: Dec 22, 2021 | 6:45 PM

2018च्या टीईटी परीक्षेत जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक अश्विन कुमार व सुखदेव डेरे यांच्यासोबत सौरभ त्रिपाठी हा ब्रोकर म्हणून काम करायचा. त्यानेच हा सगळा करार घडवून आणला होता. पुणे पोलिसांची टीम त्याच्या मागावर होती. काल रात्री उशीरा त्याला लखनऊ येथे अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतानाचा दिसून येत आहे.पुणे पोलिसांनी काल 2018 च्या टीईटी परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेला अटक करण्यात आली आहे. तर पुणे सायबर पोलिसांनी या घोटाळ्यात सहभाग असलेल्या सौरभ त्रिपाठीला रात्री उशीरा लखनौ येथून अटक केली आहे. 2018च्या टीईटी परीक्षेत जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक अश्विन कुमार व सुखदेव डेरे यांच्यासोबत सौरभ त्रिपाठी हा ब्रोकर म्हणून काम करायचा. त्यानेच हा सगळा करार घडवून आणला होता. पुणे पोलिसांची टीम त्याच्या मागावर होती. काल रात्री उशीरा त्याला लखनऊ येथे अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणून न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. आतापर्यंत पेपर फुटीमधील जी कोअर टीम होती त्यातील सर्वजणांना अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.