Diwali 2023 : QR कोड स्कॅन करा आणि यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करा, ग्रीन फटाके बाजारात दाखल
नागपूरसह देशभरातील विविध शहरात प्रदुषणाची मोठी समस्या आहे. अशात केमीकलयुक्त फटाके फोडल्यास प्रदुषणात आणखी वाढ होत असते. त्यामुळे केंद्र सरकारने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. प्रदूषण कमी करणारे फटाके कसे ओळखायचे? जाणून घ्या..
नागपूर, १० नोव्हेंबर २०२३ | दिवाळीत फटाके खरेदी करताना पर्यावरणपुरक ग्रीन फटाके कुठले? आणि ते फटाके कशे ओळखायचे? हा मोठा प्रश्न असतो. पण यावर आता सोपा उपाय आलाय. फटाक्यांच्या बॅाक्सवर असलेला क्युआर कोड मोबाईलने स्कॅन करायचा, त्यानंतर त्या फटाक्याची संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर येत असते. क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर फटाक्यांचा आवाज, ग्रीन फटाके, उत्पादन कधी झालं, रासायनिक घटक त्यात आहे की नाही. याची माहिती आपल्या मोबाईलवर येतेय. सध्या नागपूरसह देशभरातील विविध शहरात प्रदुषणाची मोठी समस्या आहे. अशात केमीकलयुक्त फटाके फोडल्यास प्रदुषणात आणखी वाढ होत असते. त्यामुळे केंद्र सरकारने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातलीय. त्यामुळे फटाके किती आवाजाचे आहे. याची माहितीही फटाक्यांच्या बॅाक्सवरील क्युआर कोड स्कॅन करुन आपल्याला मिळवता येईल. कशाप्रकारे क्युआर कोड स्कॅन करायचा जाणून घ्या…