... तर पुन्हा शाळा बंद - वर्षा गायकवाड

… तर पुन्हा शाळा बंद – वर्षा गायकवाड

| Updated on: Dec 22, 2021 | 5:34 PM

राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईच्या घणसोलीमधील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की,  राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ज्या शाळांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी आढळून आले आहेत, त्या शाळेंबाबत संबंधित शिक्षण अधिकारी निर्णय घेत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Published on: Dec 22, 2021 05:33 PM