Cabinet Expansion | राज्यसरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; पालकमंत्री पदाबाबत ही मोठी घोषणा
जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूंकप करत सत्तेत गेले. मंत्रि मंडळविस्ताराच्या चर्चा होत असताना शिंदे गटासह भाजपचे अनेक आमदार हे आपल्याला मंत्री पद मिळणार अशी शक्यता बोलून दाखवत असतानाच अजित पवार गटाने सत्तेत एन्ट्री मारली आणि मंत्री होण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले.
मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन आता १ वर्ष ही ओलांडून गेलं आहे. त्यादरम्यान सत्तासंघर्षावरील सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडला होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूंकप करत सत्तेत गेले. मंत्रि मंडळविस्ताराच्या चर्चा होत असताना शिंदे गटासह भाजपचे अनेक आमदार हे आपल्याला मंत्री पद मिळणार अशी शक्यता बोलून दाखवत असतानाच अजित पवार गटाने सत्तेत एन्ट्री मारली आणि मंत्री होण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले. त्यामुळे शिंदे गटासह भाजपमधील अनेक आमदार आजही नाराज आहेत अशी चर्चा आहे. तर याच दरम्यान आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य नाराज आमदारांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. यावेळी केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असे सांगितलं आहे. तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार असल्याचे विधान देखील केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या काही मंत्र्यांचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे. Shinde-Fadnavis-Pawar Government Cabinet Expansion,