अनिल देशमुख यांच्यासारखी वेळ कुणावरही येऊ नये, असे का म्हणाले दीपक केसरकर?
VIDEO | असंगाशी संग झाला, तर हे प्रसंग येतात, अनिल देशमुख यांच्यावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
अहमदनगर : अनिल देशमुख काय बोलले यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. त्यांनी जे भोगलय ते भोगण्याची पाळी कुणावर येऊ नये. असंगाशी संग झाला तर हे प्रसंग येतात, त्यामुळे गृहखाते हे सेन्सेटिव्ह डिपार्टमेंट आहे, मी देखील त्या विभागात काम केले आहे. गृहखात्यात काळजीपूर्वक काम करावं लागतं नाहीतर प्रसंगी अशा आरोपांना तोंड द्यावं लागतं, असे शाेलय शिक्षण मंंत्री दीपक केसरकर म्हणाले. अनिल देशमुखांबद्दल आदर असून ते न्यायालयात आपली बाजू मांडतील, याची खात्री असल्याचेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलनावर दीपक केसरकर म्हणाले, आमच्या काळात शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्यात. शेवटी बजेटच्याही मर्यादा असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार कुठेही मागे नाही त्यांच्या ज्या रास्त मागण्या असतील त्याचा विचार शासन करेलच मात्र मर्यादेपलीकडे चुकीची आणि हिंसक आंदोलनं झाली तर सरकारला कारवाई करावी लागते, असेही ते म्हणाले.