सर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9

सर्व विचार करून School सुरु करण्याचा निर्णय होईल, Murlidhar Mohol यांची माहिती-TV9

| Updated on: Jan 20, 2022 | 6:37 PM

पुण्यातील शाळांचा निर्णय अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाणार आहे, पालक , डॉक्टर, टास्क फोर्स यांची मतं विचारात घेतली जाणार आहेत, आठवड्यापासून पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या सगळ्यांचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे : पुण्यातील शाळांचा निर्णय अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाणार आहे, पालक , डॉक्टर, टास्क फोर्स यांची मतं विचारात घेतली जाणार आहेत, आठवड्यापासून पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या सगळ्यांचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मुंबईतील शाळा या 27 जानेवारीपासून सुरू (School Starting Date) होणार आहेत, तर राज्यातल्या शाळा या 24 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. शाळांबाबत आधीचेच नियम गृहीत धरले जाणार, असल्याची माहितीही काकाणी यानी दिली आहे. अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसला तरी आम्ही शाळा सुरू करण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शाळा सुरू करण्याची पालिकेची तयारी आहे, ज्यांना शाळेत यायचे आहे ते शाळेत येऊ शकतात, ज्यांना यायचं नाही, ते ऑनलाईन सहभाग नोदवू शकतात, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.