यंदा एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू राहणार, रविवारची सुटीही रद्द
पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Student) महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी शाळा (School) एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच यंदा वार्षिक परीक्षा (Examination)एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे : पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी आदेश देण्यात आले आहेत. देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना रविवारी देण्यात येणारी आठवडी सुटी आणि शनिवारची हाफ सुटी देखील रद्द करण्यात आली आहे. रविवारी ज्या विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्याची इच्छा असेल ते विद्यार्थी वर्गात बसू शकतात असे सांगण्यात आले आहे.