VIDEO : Pune Schools | पुण्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर

VIDEO : Pune Schools | पुण्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर

| Updated on: Nov 30, 2021 | 3:05 PM

मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं  शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा  निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं  शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा  निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा  15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं होतं.