मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश
राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर 1 डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईतील शाळा (Mumbai School) उद्यापासून सुरु होत आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर 1 डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईतील शाळा (Mumbai School) उद्यापासून सुरु होत आहेत. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
Published on: Dec 14, 2021 11:17 AM
Latest Videos