अयोध्या राम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर अहमदनगरचा ‘हा’ कलाकार साकारणार रामायणातील शिल्प
VIDEO | अयोध्या राम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील रामायणतील शिल्प चित्राचे काम अहमदनगरचे चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे करणार..अयोध्येत शंभराहून अधिक थ्रीडी मॉडेल साकारण्यात येणार
अहमदनगर, १८ ऑगस्ट २०२३ | येत्या पुढच्या वर्षात १६ ते २४ जानेवारी दरम्यान अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदीर लवकरच पूर्ण होणार आहे, या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर रामायणतील शिल्प चित्र दाखवण्यात येणार आहे, त्या प्रसंगाचे थ्रीडी मॉडेल तयार करण्याचे काम अहमदनगरचे चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांना मिळाले असून सध्या नगरमध्ये या मूर्तीचे काम अतिशय वेगाने सुरू आहे, या कामामुळे आता त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शंभराहून अधिक थ्रीडी मॉडेल साकारण्यात येणार आहे. या मॉडेलवरून दगडाचे कोरीव काम केले जाणार आहे. तर हे काम मला मिळाले हे माझे भाग्य आहे, अशा भावा त्यांनी व्यक्त केले आहे.
Published on: Aug 19, 2023 12:07 AM
Latest Videos