‘आमचा अंत पाहू नका…’, मनसेनं राज्य सरकारला का दिला इशारा?
VIDEO | राज्यातील टोल दरवाढी संदर्भात ठाण्यातील आनंद नगर जकात नाका या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमरण उपोषण सुरू आहे. तर मनसेच्या या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. ठाण्यात ठिय्या मांडून बसलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी काय दिला राज्य सरकारला इशारा?
ठाणे, ६ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील टोल दरवाढी संदर्भात आनंद नगर जकात नाका या ठिकाणी आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. काल उशिरा एमएसआरडीसी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अधिकारी यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांची चर्चा केली. परंतु या चर्चेमध्ये कुठलाही प्रकारचा ठोस निर्णय एमएसआरडीसी यांच्या वतीने मनसेला देण्यात आलेला नाही. आमरण उपोषणाला मनसेचे अनेक पदाधिकारी आनंद नगर जकात नाका या ठिकाणी ठिय्या मांडून बसले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असंच सुरू राहणार असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. तर आमचा अंत पाहू नका, असा थेट इशारा सरकार आणि प्रशाससनाला अविनाश जाधव यांनी दिला आहे.
Published on: Oct 06, 2023 04:49 PM
Latest Videos