Bharati Pawar | भारतात दुसरी लाट अजून संपली नाही, भारती पवार यांचं मत

Bharati Pawar | भारतात दुसरी लाट अजून संपली नाही, भारती पवार यांचं मत

| Updated on: Oct 18, 2021 | 7:36 PM

भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. काही देशात तिसरी आणि चौथी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. सध्यातरी पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसबाबत गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबत अद्याप कुठलीही मार्गदर्शक तत्वे नाहीत, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं.

भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. काही देशात तिसरी आणि चौथी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. सध्यातरी पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसबाबत गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबत अद्याप कुठलीही मार्गदर्शक तत्वे नाहीत, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आवश्यक बाबी लवकरच पूर्ण केल्या जातील, असं पवार म्हणाल्या.

दरम्यान, कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना दिवाळीपूर्वी शिथिलता देण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्याबाबत टाक्स फोर्सच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यतेबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मतं विचारात घ्यायला हवी. तज्ज्ञांकडून अद्याप तरी एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर कुठे जाण्यास परवानगी द्यावी अशा शिफारसी नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.

त्याचबरोबर लसीच्या तुटवड्यावर हा पर्याय असू शकत नाही दोन लसींमधील अंतर कमी करण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. पण हा राजकीय विषय नाही. याबाबत शास्त्रज्ञांकडून योग्य अभ्यास होऊन निर्णय होणं अपेक्षित आहे, असंही डॉ. भारती पवार म्हणाल्या. राजेश टोपे यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना नियमांतून शिथिलता देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावर डॉ. पवार यांनी आपलं मत मांडलं आहे.