पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात गुप्त भेट ? चर्चेला सुरुवात
पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या बैठकीत नेमकं काय ठरले हे कळालेले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी अशी बैठक झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. वंचित फॅक्टरने साल 2019 लोकसभेत सांगली, हिंगोली, हातकणंगले, नांदेड, बुलडाणास बीड, संभाजीनगर, परभणी, गडचिरोली अशा नऊ जागी आघाडीला फटका बसला होता.
मुंबई | 31 डिसेंबर 2023 : पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा आहे. या बैठकीत नेमकं काय ठरले हे कळालेले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी अशी बैठक झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. मात्र येत्या दहा दिवसात महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याने या बैठकीला महत्व आले आहे. वंचित फॅक्टरने साल 2019 लोकसभेत सांगली, हिंगोली, हातकणंगले, नांदेड, बुलडाणा, बीड, संभाजीनगर, परभणी, गडचिरोली अशा नऊ जागी आघाडीला फटका बसला होता. सांगलीत कॉंग्रेसचे विशाल पाटील 1 लाख 64 हजार मतांनी पराभूत झाले. तेथे वंचित 3 लाख 234 मते मिळाली, नांदेडला कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांचा 40 हजाराने पराभव झाला तेथे वंचित 1 लाख 66 हजार मते घेतली. बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे 1 लाख 33 हजार मताने पराभूत झाले तेथे वंचितला 1 लाख 72 हजार मते मिळाली. परभणीत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा 42 हजार मतांनी पराभव झाला, तेथे वंचितला 1 लाख 49 हजार मते मिळाले. हातकणंगले येथे राजू शेट्टी 96 हजार पराभूत झाले तेथे वंचितला 1 लाख 23 हजार मते मिळाली. लोकसभेच्या आठ जागांवर आघाडीचे उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाले त्याहून जवळपास दुप्पट किंवा सरासरी 15 हजार जादा मतं वंचितनं खेचली होती.