Breaking | महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीत खलबतं, मोदी-शाह-फडणवीसांमध्ये 2 तास चर्चा?

Breaking | महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीत खलबतं, मोदी-शाह-फडणवीसांमध्ये 2 तास चर्चा?

| Updated on: Jul 02, 2021 | 12:46 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकींचा (Secret meeting) सिलसिला सुरु असल्याचं दिसतंय. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याही गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकींचा (Secret meeting) सिलसिला सुरु असल्याचं दिसतंय. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याही गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.