मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? महाविकास आघाडीचं सूत्र ठरलं? काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
Prithviraj Chavan on post of Chief Minister : महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाला जास्त जागा असणार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. थोडक्यात ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हेच सूत्र असणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. बघा नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. तर आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर प्रचार करणार असे म्हणत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्राची ही परंपरा आहे की, ज्यावेळेला आपण विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळेला कोणाच्या चेहऱ्याचं प्रातिनिधित्व करत नाही, त्याला गरज नाही. तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आम्ही सत्तेत आल्यानंतर तो जाहीरनामा पूर्ण करू. इतकंच नाहीतर अशीही परंपरा आहे की, ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. मग तेव्हा मुख्यमंत्री कोणाला करायचं हे तो तो पक्ष ठरवत असतो’, असंही स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे.