‘जे प्रयत्न सुरु, ते हास्यास्पद’; जाहिरातीवरून टीका करणाऱ्यांना रामदास कदम यांनी फटकारलं
VIDEO | '... त्यामुळेच विरोधकांना पोटदुखी', शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र, नेमका काय केला हल्लाबोल?
रत्नागिरी : सलग दोन दिवस प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिरातीवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात सर्वात अधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आणी तरीही उद्धव ठाकरे यांचा लोकप्रियतेत 1 नंबर आला म्हणून जाहिराती छापल्या गेल्या, त्यावेळी हे प्रश्न का उपस्थित करण्यात आले नाहीत, असा उलट सवाल रामदास कदम यांनी विरोधकांना केला आहे. तसेच शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेत आहेत त्यामुळेच विरोधकांना पोटदुखी झाली आहे. लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून टीका करून शिंदे – फडणवीस यांच्यात फुट पाडण्यासाठी विरोधकांचे जे प्रयत्न सुरु आहेत ते हास्यास्पद असल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. दरम्यान रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.