जेष्ठ समाजसेवक Anna Hazare राज्य सरकारविरोधात बसणार आमरण उपोषणाला

| Updated on: Feb 09, 2022 | 7:28 PM

हा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर उपोषण हाच एकमेव पर्याय आमच्याकडे राहिल असे त्यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण करणार असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.

अहमदनगर : अहमदनगरला राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीला उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसंबंधी घेतलेले धोरण अत्यंत घातक असून, या निर्णायामुळे युवा पिढी व्यसनाधीन होण्याची भीती अण्णांनी व्यक्त केलीय आहे. तसेच केवळ राज्याचा महसूल वाढवण्यासाठी वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हितासाठी घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका अण्णांनी केलीय. तर हा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर उपोषण हाच एकमेव पर्याय आमच्याकडे राहिल असे त्यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण करणार असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.