Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील हिमवादळात 7 जवान शहीद; दोन दिवसांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील हिमवादळात 7 जवान शहीद; दोन दिवसांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन

| Updated on: Feb 08, 2022 | 11:01 PM

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकलेल्या 7 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्काराकडून घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात  (Avalanche) अडकलेल्या 7 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्काराकडून (Indian Army) घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 6 फेब्रुवारीला कामेंग सेक्टरमधील अति उंच भागात हिमस्खरन झाले होते. यामध्ये काही भारतीय जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर लष्कराकडून शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. अखेर दोन दिवसांनी ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत सात भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अधिकृत सूत्रांकडून या घटनेबाबत सोमवारीच माहिती देण्यात आली होती. कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलन झाले असून, त्यात काही भारतीय जवान अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.