Manoj Jarange Patil LIVE : जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस, तब्येत खालावली; कोणत्या मुद्द्यावर केलं भाष्य
Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज त्यांनी जालन्यातील अंतरावली सराटी गावात पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर भाष्य केले आहे.
Manoj Jarange Patil on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत जात आहे. त्यांना काल वैद्यकीय उपचार घेण्यास देखील नकार दिला होता. मात्र गावकऱ्यांच्या आणि मराठा समाजाच्या आग्रहानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पाणी प्यायले. मात्र अद्याप ते पूर्णतः व्यस्थित नसल्याचे दिसतेय. आज त्यांनी जालन्यातील अंतरावली सराटी गावात पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा कुणबी दाखले देण्याचा निर्णय फेटाळला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांना फोन देखील आला. मुख्यमंत्री शिंदे यांना आपण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पुन्हा केली असल्याचे त्यांनी म्हटले.

नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर

कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?

जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र

अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
