Jio Network down | मुंबई, ठाणेसह नवी मुंबईत जिओ नेटवर्कची दांडी गुल
गेल्या तासाभरापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं (Reliance Jio) नेटवर्क ठप्प आहे. 12.15 वाजल्यापासून जिओचं नेटवर्क (Jio Network Down) बंद आहे. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या तासाभरापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं (Reliance Jio) नेटवर्क ठप्प आहे. 12.15 वाजल्यापासून जिओचं नेटवर्क (Jio Network Down) बंद आहे. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीचं काम करत असून लवकरच सेवा सुरळीत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. जियोचं नेटवर्क ठप्प असल्याने कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे. याचा जियोच्या (Jio) ग्राहकांना फटका बसत आहे. कंपनीला काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, आणि ठाणे या परिसरामध्ये जियोचं नेटवर्क गायब झाल्याचे बोलले जात आहे. कंपनीचे कर्मचारी यावर काम करत आहेत. काही तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हा प्रॉब्लेम लवकरच दुरुस्त केला जाईल आणि सर्वांच्या मोबाईलवर नेटवर्क असेल, अशी प्राथमिक माहिती कंपनीने दिली आहे.