Aryan Khan | शाहरुख खानचा मुलगा आर्यनची कोठडी वाढणार? मुंबईच्या किला कोर्टाबाहेरून थेट LIVE

Aryan Khan | शाहरुख खानचा मुलगा आर्यनची कोठडी वाढणार? मुंबईच्या किला कोर्टाबाहेरून थेट LIVE

| Updated on: Oct 04, 2021 | 5:00 PM

एनसीबीने  आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने शनिवारी रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत.

एनसीबीने  आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने शनिवारी रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने आर्यनसह दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रविवारी रात्री दबंग खान सलमान रात्री 10 च्या आसपास शाहरुखच्या घरी पोहोचला. अर्धा तास त्याच्याशी चर्चा केल्यानंतर तो शाहरुखच्या घराबाहेर पडला. या भेटीत त्याने शाहरुखला धीर दिल्याची माहिती आहे. आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही. तसेच त्याला पाहुणा म्हणून पार्टीत नेलं होतं, आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांचा कोर्टात दावा, तर अरबाजकडे 6 ग्रॅम चरस सापडलं, एनसीबी वकिलांचा कोर्टात दावा..