शिंदे-भाजप सरकार पडणार? शहाजीबापू म्हणाले, 1995 साली पवारांनी हेच केलं… ऐका किस्सा Video!

एवढा मोठा आकडा खोडून काढणं त्यांना जमणार नाही, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

शिंदे-भाजप सरकार पडणार? शहाजीबापू म्हणाले, 1995 साली पवारांनी हेच केलं... ऐका किस्सा Video!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 2:12 PM

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी (Shirdi NCP) येथील अधिवेशन संपल्यानंतर एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) आणि भाजपची युती असलेलं सरकार पडणार असल्याचं भाकित जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. त्यानंतर अजित पवार यांनीदेखील आकड्यांचं गणित सांगत, 145 चा आकडा गाठला जाईल, तेव्हा हे सरकार कोसळेल, असं वक्तव्य केलंय. त्यानंतर अमोल मिटकरी यांनीही याला दुजोरा दिला. यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उत्तर दिलंय. पुढचे 15 वर्ष तरी शिंदे आणि फडणवीस हेच महाराष्ट्रावर राज्य करतील, असं त्यांनी म्हटलं..

शहाजी बापू पाटील टीव्ही9 शी बोलताना म्हणाले, ‘ अशी भाकितं यापूर्वीही झाली आहेत. 1995 साली मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी 5 वर्ष पवारसाहेब सांगायचे. सरकार पडणार. पण मनोहर जोशी आणि राणे साहेबांचं सरकार काही केल्या पडलं नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आताही सरकार पडणार पडणार म्हणतायत.. भाजप-शिंदेंकडे एकामागून एक लोक जातायत, त्यांना भीती दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशी वक्तव्य करतायत, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलंय.

 उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची आषाढी कार्तिकी असेल, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. त्यावर शहाजी बापू म्हणाले, पुढची 15 वर्षे इकडे दुसरं कुणी येणार नाही. फडणवीस आणि शिंदेच आषाढी-कार्तिकीला येतील.

सध्या भाजप-शिंदे सरकारकडे 175 चा खणखणीत आकडा आहे. त्यामुळे 145 चा आकडा गाठल्यावर सरकार पडणार, असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांची भीती बाळगण्याचं कारण नाही, असं शहाजी बापू पाटील म्हणाले. कारण 1995 मध्ये आमदारांचं संख्याबळ कमी असतानाही त्यांना हे करता आलं नाही. आता एवढा मोठा आकडा खोडून काढणं त्यांना जमणार नाही, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.