शहाजी बापू यांची मराठा आंदोलकांनी का अडवली गाडी? अन् चालकांवर केला मोठा आरोप
पंढरपूर, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा कार्यकर्ते पंढरपुरात चांगलेच आक्रमक झाले. तर ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल’ या डायलॉगमुळे फेमस झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची पंढरपूरच्या कराड नाक्यावर गाडी अडवली. तुम्हाला गावबंदी असताना तुम्ही इथे का आलात? असा जाबही आंदोलकांनी विचारला.
पंढरपूर, १ नोव्हेंबर २०२३ | ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल’ या डायलॉगमुळे फेमस झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडी अडवली. ही गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याचे पाहायला मिळाले. पंढरपूर येथे मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पंढरपूरच्या कराड नाक्यावर शहाजी बापूंची गाडी अडवली. यावेळी शहाजी बापू यांच्या गाडीच्या चालकाने गाडी अंगावर घातल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. तर आंदोलक शहाजी बापू पाटील यांच्या चालकावर संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी त्यांच्या चालकाला शिवीगाळ केली. हा मोठा राडा झाल्यानंतर शेवटी शहाजी बापू पाटील यांना गाडीतून खाली उतरावं लागलं. उतरल्यानंतर शहाजी बापूंनी आंदोलकांना हात जोडले आणि त्यांची माफी मागितली. तुम्हाला गावबंदी असताना तुम्ही इथे का आलात? असा जाबही आंदोलकांनी त्यांना विचारला.