Shahajibapu Patil | मातोश्रीच्या दारी सुखशांती नांदू दे, शहाजीबापूंचे गणरायाला साकडे
Shahajibapu Patil | मातोश्रीच्या दारी सुखशांती नांदू दे, असे साकडे शहाजीबापू पाटील यांनी गणरायाला घातले.
Shahajibapu Patil | मातोश्रीच्या दारी सुखशांती नांदू दे, असे साकडे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी गणरायाला घातले. शिवसेनेच्या आमदारांनी (Shivsena MLA) बगावत, बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर उघडपणे जहरी टीका केली. आदित्य ठाकरे यांनी अनेकदा बंडखोरांना गद्दार म्हटले. शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांनीही पलटवार केला. पण त्यांनी अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली नाही. उलट आता शहाजीबापू पाटील यांनी मातोश्रीत सुखशांती नांदावी यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली आहे. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा काढणार आहेत. त्यावेळी त्यांची सभा शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातही होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या सुखशांतीसाठी केलेली ही प्रार्थना चर्चेचा विषय ठरली आहे.