'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?

‘एकनाथ शिंदे हे वाघ’, असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?

| Updated on: Oct 01, 2023 | 4:08 PM

VIDEO | छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आणण्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केलेल्या वाघनखांबाबतच्या त्या मागणीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय

धाराशिव, १ ऑक्टोबर २०२३ | शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी वाघनखे खरे की खोटे यावर चर्चा करू नये, वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत. त्यावर ब्र शब्द काढू नये, असे म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांबाबत शहाजी बापू यांनी फटकारले. म्हणाले, घरात कोंडून घेऊन कुलूप लावून बसण्यापेक्षा विदेश दौरा केलेला कधी बरा, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर राज्याची प्रगती करण्यासाठी विदेश दौरा गरजेचं असतो, ते प्रगतीचे लक्षण असल्याचे म्हणत ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तर शिवसेनेचा खरा वाघ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात परत येत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांना वाघाची उपमा देत ठाकरे कुटुंबाला शहाजी बापू यांनी डवचल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Oct 01, 2023 04:08 PM