''सत्ता ही भांग...'' या वक्तव्यावर शंभूराजे देसाई यांचा पलटवार, म्हणाले....

”सत्ता ही भांग…” या वक्तव्यावर शंभूराजे देसाई यांचा पलटवार, म्हणाले….

| Updated on: May 27, 2023 | 7:15 AM

सत्ता मिळाल्यावर काही लोकं डुलायला आणि नाचायला लागतात. मात्र नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल, अशी टीका खोत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी त्यांना प्रत्युतर दिलंय.

सातारा : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचे पहालयला मिळत आहे. सत्ता ही भांग पिल्यासारखी असते. सत्ता मिळाल्यावर काही लोकं डुलायला आणि नाचायला लागतात. मात्र नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल, अशी टीका खोत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी त्यांना प्रत्युतर दिलंय. देसाईंनी सदाभाऊंवर पलटवार करताना, सदाभाऊ स्वतःच भांग पित असतील यामुळं त्यांना भांगेची नशा काय असते हे माहीत आहे असं प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिले आहे. त्यामुळे आता आणखी हा वाद किती वाढतो ते बघावं लागेल.

Published on: May 27, 2023 07:15 AM