ॲक्शनला रिॲक्शन तर येणारच, कुणी कितीही मोठा असला तरी कारवाई होईल: शंभूराज देसाई
राज्यभरातील तसेच देशभरातील शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागणार असून, नारायण राणे यांनी आपलं वक्तव्य माग घ्यावं अन्यथा अॅक्शनला रिअॅक्शन येतच राहणार आहेत. आता जे प्रचलित राज्यातले नियम आहेत, त्यावर नारायण राणे यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
नारायण राणेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, ही अॅक्शनला रिअॅक्शन आहे, नारायण राणेंनी सुरुवात केलीय, बेजबाबदार वक्तव्याचे परिणाम येणारच आहेत, असं मंत्री शंभुराज देसाई म्हणालेत. आम्ही शासन म्हणून कायदा अबाधित राखण्याचं काम करू, पण कायदा बिघडवायची सुरुवात कोणी केली, कोण जबाबदार आहे हे निश्चित बघू, कायद्याप्रमाणे कारवाई करू, जनतेचा उद्रेक वाढला तर त्याला केवळ आणि केवळ नारायण राणे हे जबाबदार आहेत, असं गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
नारायण राणेंचं वक्तव्य अतिशय बेजबादारपणाचं आणि केंद्रीय मंत्रिपदाला न शोभणारं आहे. मंत्रिपद मिळाल्याने आभाळ दोन बोट ठेंगणं झाल्यासारखं वागणं झालंय.आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल वक्तव्य सहन करणार नाही. राज्यभरातील तसेच देशभरातील शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागणार असून, नारायण राणे यांनी आपलं वक्तव्य माग घ्यावं अन्यथा अॅक्शनला रिअॅक्शन येतच राहणार आहेत. आता जे प्रचलित राज्यातले नियम आहेत, त्यावर नारायण राणे यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.